Posts

Showing posts from 2019

ब्राह्मणांची पुजा करावी 👉 महाभारत

Image
   #भुमिका  महाभारत एक प्रसिद्ध ग्रंथ आहे.अनेक पुरातनवादी या ग्रंथात ज्ञान विज्ञान तत्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु माझ्यामते हा ग्रंथ संविधानाच्या समानतेच्या मुल्यांच्या विरोधात आहे,त्यामुळे याची समिक्षा होणे महत्वाचे आहे.  महाभारत अनुशासन पर्व अध्याय 33,34,35 पुर्ण ब्राह्मणांच्या प्रशंसेने भरलेले आहे परंतु मी पोस्ट मध्ये फक्त जास्त आक्षेपार्ह श्लोकांचा उल्लेख करत आहे.  #राजाने_ब्राह्मणांची_पुजा_करावी  अध्याय 33 मध्ये आहे कि 👇  राजाच मुख्य कर्तव्य आहे कि त्यांने ब्राह्मणांची पुजा-सेवा करावी,सुखाची इच्छा असणारया राजाने हेच करायला हवे (श्लोक 2)  राजासाठी ब्राह्मण हाच पिताप्रमाणे पूजनीय,वंदनीय,माननीय आहे (श्लोक 7)  मोठे मोठे साहसी सुद्धा त्यांना घाबरतात कारण ब्राह्मणांमध्ये गुण जास्त असतात (श्लोक 10)  अनेक क्षत्रिय जाती ब्राह्मणांची कृपा-दृष्टी न मिळाल्याने शुद्र झाल्या (22)  ब्राह्मणांसमोर हार मानण्यातच कल्याण आहे त्यांना हरवणे चांगले नाही (श्लोक 23)  एका ब्राह्मणाची हत्...

परमाणुचा शोध भारतात लागला का ?

मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल याने IIT मुंबई मधिल विद्यार्थ्यांचा ब्रेन वाश करण्यासाठी  परमाणुचा शोध चरक ऋषीने लावला अस वक्तव्य केल आहे.  एक जागृत नागरिक म्हणून या व्यक्तव्याची समिक्षा करणे मला महत्त्वाचं वाटते. तर मित्रांनो चरकच्या चरक संहितेमध्ये कुठेही परमाणुची चर्चा केलेली नाही परमाणुची चर्चा कणाद ऋषी यांनी केली आहे परंतु त्याची तुलना आधुनिक एटम बरोबर होऊ शकत नाही. #कणाद_यांच्या_परमाणुची_व्याख्या जालांतरगते भानौ यत् सूक्ष्मं दृश्यते रजः  तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते... अर्थातः खिडकी से जब सुर्य कि किरणे प्रवेश करती है तब उनमे नाचते हुये छोटे छोटे कण दृष्टीगोचर होते है. ऐसे एक कण का छटा भाग परमाणु कहलाता है. (भारतीय दर्शन,बलदेव उपाध्याय,पृष्ठ 243) हा आहे का कट्टर हिंदुचा आधुनिक परमाणु ? ऐका रे भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुनो आधुनिक एटमची साईज o.1 nm ते 0.5 nm आहे. कणादने ज्या धुळ कणांच्या सहाव्या भागाला  परमाणु म्हणले आहे त्यांची साईज 2 मिलीमीटर पर्यंत असते. त्यांचा सहावा भाग 0.3333 मिटर होईल. थोडक्यात कणादचा परमाणु आधुनिक ए...

रामाचा जन्म विज्ञान विरोधी

Image
कौशल्याची घोड्याजवळ एक रात्र आणी खिर पिऊन रामाचा जन्म अश्वमेध यज्ञ म्हणजे काय आपल्याला माहितच आहे. ज्यात राणीला घोडा लावला जायचा. तो अश्वमेध यज्ञ दशरथ राजाने हि केला होता. या यज्ञाचा उल्लेख बालकांड सर्ग 14 मध्ये आहे. पहा..... यज्ञासाठी 300 पशु आणी आणी राजा दशरथचा श्रेष्ठ घोडा बांधला होता (श्लोक 32) राणी कौशल्याने घोड्याची प्रदिक्षीणा करुन तलवारीच्या तिन वारात घोड्याला मारले (श्लोक 33) धर्मपालनाची इच्छा ठेऊन कौशल्याने घोड्याजवळ एक रात्र काढली (श्लोक 34) नंतर श्लोक 36,37,38 मध्ये घोड्याच्या चरबीच हवन केल्याचा उल्लेख आहे. (तपासुन पाहु शकता.) या यज्ञानंतर पुत्रेष्टि यज्ञाचा उल्लेख आहे. या यज्ञामुळेच खिर पिऊन तिनही राण्या गर्भवती झाल्या. पहा... बालकांड सर्ग 16 यज्ञातुन एक विशाल पुरुष प्रकट झाला (श्लोक 11) प्रकट झालेला पुरुष दशरथ ला म्हणाला.... हि देवांनी बनवलेली खिर आहे याने संतानप्राप्ती होते आणी धन व आरोग्याची वृद्धी होते (श्लोक 19) हि खिर आपल्या योग्य पत्नींना खायला दे याने त्यांची गर्भधारणा होईल (श्लोक 20) ती खिर खाऊन राजाच्या तिनही राण्यांना गर्भध...

मनुस्मृति मध्ये स्त्रियांची पुजा : वास्तव आणि भ्रम

#भुमिका संघी मनुवादी आणी आर्य समाजी आपल्या संस्कृतीच्या गौरवगाथा जेव्हा सांगायला सुरवात करतात. तेव्हा ते मनुस्मृति 3/56 चा उल्लेख नेहमी करतात. ज्या कुळात स्त्रीयांच पुजन होतं त्या कुळावर देवता नेहमी प्रसन्न राहतात. जिथे स्त्रीयांच पुजन होत नाही तिथे सर्व यज्ञादि कर्म निष्फळ होतात. (मनु : 3/56) परंतु हे नक्की खर आहे का? खरच मनुने स्त्रीयांची पुजा करायला सांगितलं आहे का ? का हे भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनात जाती धर्माचा अहंकार निर्माण करण्याच एक षडयंत्र आहे ? #समिक्षा मनु: 3/56 च्या वरचे श्लोक पाहिले तर लक्षात येतं कि प्रसंग विवाहाचा चालु आहे. कन्या की प्रीति के लिए वरपक्ष वाले जो धन दें उसे कन्या के पिता आदि स्वयं न लें, अपितु कन्या को ही दें (मनु: 3/54) पुढील श्लोकात मनुस्मृति ने स्त्रीयांच पुजन करायला सांगितलं आहे हे पुजन म्हणजे भक्ती-पूजा करणे,अगरबत्ती लावणे नाही. हे पुजन म्हणजे विवाहित स्त्रीला विशिष्ट प्रसंगी म्हणजे सण उत्सवाच्या वेळी चांगल भोजन आणी नविन वस्त्र घेऊन देणे आहे. कारण धन संपत्ती ठेवण्याचा अधिकार फक्त पुरूषांकडे होता. स्त्रीयांकडे नाही...

ओम् शब्द: वास्तव आणि भ्रम

संघी मनुवादी ओम् शब्दाबद्दल अनेक दुष्प्रचार करत आहे. कोणी म्हणत आहे सुर्यातुन ओम् ध्वनी येत आहे हे नासाने पण मान्य केलं आहे. कोणी म्हणत आहे ओम् शब्दाचा उच्चार केल्यावर शरीरात उर्जा तयार होते. कोणी म्हणत आहे नासा ओम् शब्दावर संशोधन करत आहे. परंतु हे नक्की खर आहे का ? का भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनात जाती धर्माचा अहंकार निर्माण करण्याच एक षडयंत्र. तैत्तिरिय उपनिषद् मधिल शीक्षा  वल्ली अष्टक अनुवाक मध्ये ओम् शब्दाबद्दल आहे कि 👇 जब हम किसी बात का अनुमोदन करते है, यह कहना हो कि यह ठीक है 'ओम् इति' कहते है,जब आचार्य से कहते है कि कुछ उपदेश दे तो वह ठिक है (ओम् इति) ऐसा कह कर हि उपदेश देता है. यज्ञ मे मंत्रो को ऋत्त्विक् 'ओम्' कह कर हि पढते है. ब्रह्मा नामक ऋत्त्विक् ओम् कहकर ही यज्ञ कर्म करने की अनुमती देता है. और अध्ययन के लिए उद्दत ब्राह्मण 'ओम' कह कर ही वेद का अध्ययन करता है. (तैत्तिरिय उपनिषद् 1/8) अशा प्रकारे अष्टम अनुवाक मध्ये ओम् शब्दाच्या उपयोगाबद्दल सविस्तर वर्णन आहे. तैत्तिरिय उपनिषद् वरुनच सिद्ध आहे कि ओम् शब्द हा होकारार्थी शब्...

रामाचे वास्तविक चरित्र 👉 वाल्मिकी रामायण

Image
राम भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या आस्थेच प्रतीक आहे. राम आदर्श पुत्र,आदर्श भाऊ,आदर्श  पति होते अशी हिंदु समाजत मान्यता आहे. रामाच्या या आदर्श चरित्रामुळे राम-मंदिर हा हिंदुत्ववाद्यांचा प्रमुख मुद्दा आहे. परंतु रामाच चरित्र खरच एवढं आदर्श होतं का याची चिकित्सा करुन भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुना आरसा दाखवणे महत्वाचं आहे #बाबासाहेब_आंबेडकरांच_मत रामाबद्दल बाबासाहेब म्हणतात कि रामाला मद्दपान वर्ज्य नव्हते.राम भरपुर मद्द पित असे आणी वाल्मिकीच्या म्हणन्यानुसार या मद्दमैफलीत आपल्यासमावेत सीतेलाही सहभागी करुन घेण्यावर रामाचा कटाक्ष असे. वाल्मिकीने रामाच्या जनान्याचे जे वर्णन करुन ठेवले आहे ते पाहता तेथे नृत्य-गाण कलेत निपुण असणारया अप्सरा,उरगा आणी किन्नरी होत्या. यासुंदरीच्या घोळक्यात मध्ये बसुन रामाचे मद्दपान आणी नाचगन चालत असे त्या रामाला खुष करीत असे आणी राम त्यांना हार घालत असे. (राम आणि कृष्णाचे गौडबंगाल,पृष्ठ  14) रामाच्या अशा वागण्याचा आर्य समाजी आणी कट्टर हिंदु कोणता आदर्श घेणार आहे. #जन्माची_कथा_विज्ञान_विरोधी राम जन्माच्या कथेबद्दल मी काही महिन्यांप...

ब्राह्मण पाहुण्याबरोबर सेक्स 👉 महाभारत

Image
इंग्रजांमुळे हिंदु संस्कृती बिघडली असा हास्यास्पद दावा कट्टर हिंदुचा असतो. कधी कधी ते Bollywood ला ही दोष देतात. परंतु खरच हिंदु धर्म इतका महान आहे का ? महाभारत,अनुशासनपर्व 2 मध्ये एक कथा आहे. दुरदर्शन नावाचा एक गृहस्थ असतो.त्याच्या पत्नीचे नाव ओघवती असते. श्लोक 41 नुसार त्याला गृहस्थ धर्माच पालन करुन मृत्यू वर विजय मिळवायचा असतो. तो त्याच्या पत्नीला सांगतो..... जिस-जिस वस्तु से अतिथी संतुष्ट हो वह वस्तु तुम्हे सदा हि उसे देनी चाहिए. यदि अतिथी के संतोष के लिए तुम्हे अपना शरीर भी देना पडे तो मनमे कभी अन्यथा विचार न करना (श्लोक 43) एके दिवशी सुदर्शन च्या अनुपस्थितीत एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या घरी आला, सुदर्शनची पत्नी ओघवतीने वेदोक्त विधीने त्याची पुजा केली. नंतर ओघवती ने ब्राह्मणाला विचारल आपल्याला कोणत्या वस्तुची आवश्यकता आहे ? ब्राह्मण म्हणतो.... यदि तुम्हे गृहस्थ धर्म मान्य है तो मुझे अपना शरीर देकर मेरा प्रिय कार्य करना चाहिए (श्लोक 54) ओघवती शरीर देण्यासाठी तयार होते. ब्राह्मण आणि ओघवती दोघेही घरात जातात. थोड्या वेळाने सुदर्शन तेथे येतो. आपल्या पत्नीने ...

मनुस्मृति मध्ये मुत्र-विसर्जनाचे नियम

Image
मनुस्मृति मध्ये फक्त स्त्री शुद्र विरोधी कठोर कायदेच नाही तर अनेक विचित्र नियम पण आहे. जे आत्ताच्या युगात जोक म्हणुन मनोरंजनासाठी आपण वाचु शकतो. मनुच म्हणन आहे.... जो विवर या गढे प्राणियोंसे युक्त हो उनमे,चलते-चलते या #खडे_होकर, नदी के तट पर या पहाड कि चोटी पर मलमुत्र न करे. (मनु : अध्याय 4,श्लोक 47) ////////////////////////////////// बाकीचे नियम ठिक आहे पण उभ्याने मुत्र केल्याने काय फरक पडणार आहे. आधी धोतरामुळे पुरुष पण खाली बसत असतील, पण आता तर सर्वांकडे पैन्ट आहे. पैन्टला चैन पण आहे. आता तर हा नियम कालबाह्य झाला आहे. मनु समर्थक हा नियम पाळु शकता.

बुद्ध वेदांचे समर्थक होते का?

जगात जे काही चांगलं आहे ते आपल्या धर्मातील असल्याचा दावा करणे आणी स्वतःच्या धर्मात जे वाईट आहे दुसरयावर ढकलुन देणे हे हिंदुत्ववाद आणी आर्य समाजी तत्वज्ञानाच मुख्य लक्षण आहे. हीन भावनेने ग्रस्त असलेल्या कट्टर हिंदु आणी आर्य समाज ला बुद्ध धम्माच स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. कधी बुद्धाला रामाचा वंशज म्हणल जात,कधी बुद्धाने अष्टांगिक मार्ग वेदांतुन घेतल्याचा दावा केला जातो, तर कधी बुद्ध वेद समर्थक असल्याचा दावा केला जातो. #वेद_निंदक_बुद्ध दिघनिकाय ग्रंथामध्ये बुद्ध वेदांबद्दल म्हणतात सेय्यथापि,वासेठ्ठ,अन्धवेणि परम्परासंसत्ता पुरिमो पि न पस्सति मज्झिमो पि न पस्सति पच्छिमो पि न पस्सति | एवमेव खो, वासेठ्ठ अन्धवेणूपमं मज्जे तेविज्जानं ब्राह्मणानं भासितम् | तेसमिदं तेविज्जानं ब्राह्मणानं भासितं सम्पज्जति नामकत्र्त्रेव सम्पज्जति, रित्तकत्र्त्रव सम्पज्जति तुच्छकत्र्त्रव सम्पज्जति | अर्थ : जैसे वासेठ्ठ अंधो की पंक्ति में खडा न पहला अंधा, न बिच वाला और न पीछे वाला हि देख सकता है ,ऐसी ही वासेठ्ठ, अंधवेणी के समान वेदवादी ब्राह्मणों का कथन है. उन वेदवादियों का कथन प्रलाप मात्र ठहरता ह...

आर्य समाज मनुस्मृति खंडन

मनुस्मृति मध्ये मिलावट झाल्याचा दावा सर्वांत आधी स्वामी दयानंद यांनी केला मनुस्मृति अध्याय 9 श्लोक 317 आणी 319 वर ते म्हणतात..... प्राचिन ग्रंथो मे बनावटी श्लोक डाल कर और नवीन रचनाएं कर के ब्राह्मणो ने अपनी शक्ति बढाई और मन्वादि स्मृतीयों में भी अपने महत्व के वाक्य मिला दिए. यदि दुष्टाचरण वाले ब्राह्मण की कोई निंदा करता, तो उस को ब्रह्मविरोधी कह कर उस कि हड्डी-हड्डी निकाल लेते थे. (स्वामी दयानंद सरस्वती, पुना प्रवचन पृष्ठ 134) यावर आर्य समाजी विद्वानांनी मनुस्मृति मधिल विवादित श्लोकांना प्रक्षिप्त घोषीत करायला सुरवात केली. विशुद्ध मनुस्मृति बनवण्याचा पहिला प्रयत्न आर्य समाजी तुलसीराम यांनी केला. आपल्या मनुस्मृति भाष्यामध्ये त्यांनी 382 श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले. दर वेळेस त्यांनी वेगळेच श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले पहिल्या 4 संस्करणात 382 श्लोक प्रक्षिप्त आहे तर पाचव्या संस्करणात 371 श्लोक प्रक्षिप्त आहे. 20 व्या शतकाची सुरवात नुकतीच झाली होती बदलत्या दृष्टीकोणानुसार 371 विवादित श्लोक आर्य समाज ला प्रक्षिप्त वाटत होते. ज्यात मांसक्षण,शुद्र विरोधी अमानविय कायदे आहेत...