आर्य समाजी मनुस्मृति विशुद्ध का अशुद्ध ?

आर्य समाजी मनुस्मृति थोडक्यात समिक्षा.

आर्य समाज कडे 2 मनुस्मृति आहे.
 पंडित तुलसीरामचा अनुवाद आणी डाॅ.सुरेंद्र कुमार यांचा अनुवाद.

सुरेंद्र कुमार यांनी आपल्या पुस्तकाला विशुद्ध मनुस्मृति नाव दिल आहे.

सुरेंद्र कुमार यांनी आपल्या तथाकथित विशुद्ध मनुस्मृति मधुन एकुण 2685 श्लोकांपैकी 1502 श्लोकांना प्रक्षिप्त म्हणलेल आहे.
केवळ 1183 श्लोकांना मुळ मनुस्मृतितील श्लोक मानले आहे.

मनुस्मृति चे पहिले भाष्यकार मेधातिथि ज्यांचा कालखंड 7 व्या किंवा 8 व्या शतकातील आहे.
त्यांच्या भाष्यात जे श्लोक नाही परंतु नंतरच्या भाष्यांत जे श्लोक आहेत त्यांना आपण प्रक्षिप्त म्हणु शकतो.
व्याख्याकारांनी याबद्दल सुचितही केलेलं आहे.

12 व्या शतकातील मनुस्मृति चे प्रसिद्ध भाष्यकार कुल्लुक भट्ट ने 2685 पैकी 170 श्लोक प्रक्षिप्त सांगीतलेल आहे.

यावरुन हे सिद्ध आहे कि ज्या 1502 श्लोकांना आर्य समाजी प्रक्षिप्त मानतात त्यापैकी 1332 श्लोक असे आहेत ज्यांना प्राचिन व्याख्याकारांनी प्रक्षिप्त मानलेल नाही.

याच मुख्य कारण म्हणजे प्राचिन काळात या श्लोकांकडे त्या दृष्टीने बघीतल जात नव्हतं ज्या दृष्टीने 20 व्या शतकातील आर्य समाजी सुरेंद्र कुमार ने बघीतल आहे.

सर्वांना माहिती आहे ज्या 1502 श्लोकांना आर्य समाजी प्रक्षिप्त मानतात ते सगळे गौमांस,स्त्री शुद्र अत्याचार,भेदभाव,विचित्र नियम याच्याशी संबंधीत आहे.

सुरेंद्र कुमारने आपल्या मनुस्मृति मध्ये फक्त त्यांच श्लोकांना विशुद्ध मानले आहे जे 20 व्या शतकातील मानवाला अयोग्य वाटणार नाही.

हा आधुनिक दृष्टिने प्राचिन काळातील नियमांकडे बघण्याचा परीणाम आहे.

आर्य समाजाची तथाकथित विशुद्ध मनुस्मृति ती मनुस्मृति नाही जी प्राचिन काळात प्रचलित होती.

मनुस्मृतिला विशुद्ध दाखवण्यासाठी वाटेल त्या श्लोकाला प्रक्षिप्त म्हणुन आर्य समाजी आपल्या धर्माच वास्तविक स्वरुप नकारत आहे

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से