वैदिक विमानशास्त्राचा भांडा-फोड
कट्टर हिंदु आणी आर्य समाजी ज्या ग्रंथाच्या आधारे विमानाचा शोध भारतात लागला आहे हे सांगत असतात तो ग्रंथ म्हणजे बृहदविमानशास्त्र. व्यामानिकशास्त्रम् नावाने या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद पण झाला आहे. हा ग्रंथ महर्षी भारद्वाज ने लिहीला आहे आणी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच प्राचिन काळात विमान बनवल जायच अस त्यांच मत आहे. दोन्ही ग्रंथांचा विद्वानांनी अभ्यास केला आणी जे निष्कर्ष काढले ते साइंटिफिक ओपिनियन( मे 1974) आणी विज्ञान परिचय(जुन 1979) मध्ये दोन्ही पत्रिकामध्ये प्रकाशित झाले आहेत. सर्वांत आधी हा ग्रंथ प्राचिन नसल्याच सिद्ध करु आणी नंतर यातील विमानशास्त्र कस विज्ञान विरोधी आहे हे दाखवुन देऊ. #ग्रंथ_प्राचिन_असल्याच_खंडन मैसुर संस्करणानुसार हा ग्रंथ पं.सुब्बाराय शास्त्री ने बंगळूर मध्ये श्री.जी. वेंकटाचल शर्मा कडुन 1904-1908 मध्ये लिहुन घेतला होता. पहिला दिव्य शक्तीच्या बळावर माहिती सांगत होता आणी दुसरा लिहीत होता. व्यामानिकशास्त्राचे चित्र बंगळूरच्या इंजिनियरिंग काॅलेज च्या एक ड्राफ्ट्समन अल्लपा ने 1900 आणी 1918 मध्ये बनवले होते. यावरुन सिद्ध आहे कि हा ग्रंथ प्राचिन नसुन आ...