वैदिक विमानशास्त्राचा भांडा-फोड
कट्टर हिंदु आणी आर्य समाजी ज्या ग्रंथाच्या आधारे विमानाचा शोध भारतात लागला आहे हे सांगत असतात तो ग्रंथ म्हणजे बृहदविमानशास्त्र.
व्यामानिकशास्त्रम् नावाने या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद पण झाला आहे.
हा ग्रंथ महर्षी भारद्वाज ने लिहीला आहे आणी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच प्राचिन काळात विमान बनवल जायच अस त्यांच मत आहे.
दोन्ही ग्रंथांचा विद्वानांनी अभ्यास केला आणी जे निष्कर्ष काढले ते साइंटिफिक ओपिनियन( मे 1974) आणी विज्ञान परिचय(जुन 1979) मध्ये दोन्ही पत्रिकामध्ये प्रकाशित झाले आहेत.
सर्वांत आधी हा ग्रंथ प्राचिन नसल्याच सिद्ध करु आणी नंतर यातील विमानशास्त्र कस विज्ञान विरोधी आहे हे दाखवुन देऊ.
#ग्रंथ_प्राचिन_असल्याच_खंडन
मैसुर संस्करणानुसार हा ग्रंथ पं.सुब्बाराय शास्त्री ने बंगळूर मध्ये श्री.जी. वेंकटाचल शर्मा कडुन 1904-1908 मध्ये लिहुन घेतला होता.
पहिला दिव्य शक्तीच्या बळावर माहिती सांगत होता आणी दुसरा लिहीत होता.
व्यामानिकशास्त्राचे चित्र बंगळूरच्या इंजिनियरिंग काॅलेज च्या एक ड्राफ्ट्समन अल्लपा ने 1900 आणी 1918 मध्ये बनवले होते.
यावरुन सिद्ध आहे कि हा ग्रंथ प्राचिन नसुन आधुनिक काळातील आहे.
भाषा वैज्ञानिकांच्या दृष्टीनेही हा ग्रंथ प्राचिन नाही. या ग्रंथातील संस्कृत प्राचिन संस्कृत प्रमाणे नाही.
यात कुठल्याच श्लोकात वैदिक छंदांचा प्रयोग केलेला नाही.
प्रो. एच.एस. वरदेशिकाचार्य प्रसिद्ध संस्कृत पंडितने या ग्रंथातील 50 श्लोकांच विश्लेषण केलं आणि जे परिणाम काढले ते खालीलप्रमाणे 👇
विश्लेषण केलेले श्लोक = 50
श्लोकांमधिल एकूण शब्द = 358
या श्लोकांमध्ये वैदिक शब्द = 6
वैदिक छंद असलेले शब्द = 3
छंद विषयक चुका असलेले शब्द =7
पाणिनी व्याकरणात नसलेले शब्द =2
जर हा ग्रंथ खरच भारद्वाज ऋषी ने लिहीलेला असता तर यात भरपुर शब्द वैदिक असते फक्त 6 नाही.
विश्लेषण केलेल्या 50 श्लोकांमधिल फक्त 3 छंद वैदिक नसते तर 47-48 छंद वैदिक असते.
फक्त 2 शब्द पाणिनी व्याकरणाच्या विरोधात नसते तर असंख्य शब्द शब्द अपाणिनीय असते.
जो ग्रंथ जेवढा प्राचिन असतो त्याच्यात तेवढेच जास्त वैदिक शब्द असतात,आणी तेवढ्याच वैदिक छंदांचा वापर केलेला दिसतो.आणी अनेक शब्द पाणिनी व्याकरणाच्या विरोधात असतात.कारण त्यावेळी पाणिनी व्याकरण अस्तित्वात नव्हत.
जर एखाद्या ग्रंथात पाणिनीच्या व्याकरणाच्या नियमांच पालन झालेल आहे तर तो ग्रंथ वैदिकही नाही आणि प्राचिनही नही.
अंतः हे प्रबळ पुराव्यानिशी सिद्ध आहे कि हा ग्रंथ प्राचिन नाही.
#विमानशास्त्र_विज्ञान_विरोधी
या ग्रंथात विमान उडण्याचा आणी पुढे जाण्याचा उल्लेख कुठेही नाही.
फक्त वेगवेगळ्या प्रकाराच्या विमानांची लांबी रुंदी दिलेली आहे.
या ग्रंथात विमानांची जी गती सांगितलेली आहे ती काल्पनिक आहे.
ताशी 10 हजार कि.मी. वेगाने चालणारया एका विमानाचा उल्लेख आहे.
हा ग्रंथ नक्कीच एखाद्या अर्धवट ज्ञानी व्यक्तीने लिहीलेला आहे.
कारण यात विमानाला गती देण्याची जी पद्धत सांगितली आहे ती विज्ञानविरोधी आहे.
यात एका #सुंदर नावाच्या विमानाच वर्णन आहे,जे न्युटनच्या गतीच्या दुसरया नियमाच्या विरोधात आहे.
या ग्रंथात ज्या विमानांचा उल्लेख आहे ते काल्पनिक आहे.ग्रंथात सांगितलेले विमान कधीही बनवले जाऊ शकत नाही.
या ग्रंथात 4 प्रकारच्या विमानांचा उल्लेख आहे.
1. #शकुन_विमान
शकुन विमानाच कार्य खालील श्लोकात दाखवलेलं आहे.
तथैव वातपयंत्रो दिक्प्रदर्शध्वजस्तथा,पश्चाच्छकुनयंत्रश्च तत्पक्षद्वयमेव च.
विमानोत्क्षेपणार्थं तत्पुच्छभागस्तथैव हि,
ततो विमानसंचारकारणौष्म्यकयंत्रक:
अर्थातः वायुयान के ऊंचा उठने के लिए पुच्छभाग(पुंछ) जिम्मेदार होता है...
पण आधुनिक विज्ञानानुसार विमान उडण्यासाठी पंख महत्वाचे आहे.
मागील भाग विमानावर फक्त नियंत्रण करत असतो.
ग्रंथानुसार या विमानाला बनवण्यासाठी बोराॅन खनिज,बंगाली चना,पारा,चांदि,अभ्रक,लोहबान आणी पंचामृत (दुध,साखर,तुप,दही,मध) हे सर्व एकत्र करुन 800 डिग्री तापमानावर गरम करणे.
यातुन कोणत विमान तयार होणार आहे हे आर्य समाजी आणी कट्टर हिंदुनाच माहिती.
या विमानाच्या रचनेत अस काहीच नाही कि ज्याने हे विमान उडेल आणी पुढे जाईल.
इथे ग्रंथ लेखकाने फक्त आपल अर्धवट ज्ञान दाखवलेले आहे.
2. #सुंदर_विमान
या विमानासाठी विज तयार करण्यासाठी 16 कप गाढवाच मुत्र वापरल पाहिजे.
ग्रंथानुसार ये विमान खालच्या भागातुन हवा खेचुन वरच्या भागातुन गरम गॅस सोडत असे.
ग्रंथ लिहीणारया अज्ञानी व्यक्ती चा विश्वास आहे कि या प्रक्रियेने विमान उडेल.
पण हा सिद्धांत पुर्णपणे न्युटनच्या दुसरया नियमाच्या विरोधात आहे.
सुंदर विमानाच्या गतिबद्दल सांगीतलं आहे कि...
शुण्डालैश्च तथा कीलकादिभि: प्रेरितक्रमात्, घटिकावच्छिन्नकाले योजनानां चतुश्शतम्
अर्थातः सुंदर विमान एक घटिका(24 मिनिट) में 400 योजना का सफर तय करता है.
1 योजना म्हणजे 5 मैल किंवा 10 मैल.
याचा अर्थ या विमानाची गति ताशी 5000 ते 10000 मैल आहे.
एवढ्या तीव्र गतिने चालणार विमान वातावरणाशी होणारया घर्षणामुळ जळुन राख होईल.
या विमानासाठी विज तयार करण्यासाठी एका भांड्यात हत्तीच्या मुत्रात अयस्कांत(चुंबकिय दगड) पारया बरोबर टाकला जातो.
आणी दुसरया भांड्यात गौमुत्र.
हा विमानाला उडवण्याचा बहुतेक आयुर्वेदीक उपाय आहे वैदिक धर्मामध्ये.
3. #रुक्म_विमान
या विमानाला 4 ताळे आहेत.याच्या गोलाकार पृष्ठभागाचा व्यास 1000 फुट,ऊंची 20 फुट आणी शंकु 80 फुट आहे.
या विमानाची गति ताशी 625 मैल सांगितली आहे.
एवढ्या विशाल आकाराच्या विमानाने एवढी तीव्र गति प्राप्त करणे पुर्णपणे विज्ञान विरोधी आहे.
त्यामुळे हे विमान पण ग्रंथ लेखकाची कल्पना असुन ते वास्तविक कधीही बनवल जाऊ शकत नाही.
4.#त्रिपुर_विमान
या विमानाबद्दल एवढच सांगितलं आहे कि हे आकाश,पाणी,जमिनीवर प्रवास करु शकत.
या विमानाच्या गतीच्या प्रक्रियेची व्याख्या दिलेली नाही.
ग्रंथात सांगितलेले चारही विमान काल्पनिक आहे. त्यांची सांगीतलेली गति विज्ञान विरोधी आहे.
या विमानांची रचना पुर्णपणे विज्ञान विरोधी आहे.
अतः हे सिद्ध आहे कि या ग्रंथातील विमान केवळ अज्ञानी ग्रंथ लाखकाची कल्पना आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे शिवकर बापु तळपदेनी या ग्रंथाचा अभ्यास करुन विमान बनवलं होत हि कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.
याबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.
वरील चारही विमानांची रचना विज्ञान विरोधी आहे त्यामुळे बापु तळपदेनच नाही तर जगातला कुठलाही व्यक्ती या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे विमान बनवु शकत नाही.
#राजिव_दिक्षितचा_खोटारडेपणा
राजिव दिक्षितने आपल्या अनेक व्याख्यामनामध्ये सांगितलं आहे पहिल विमान राईट बंधुनी बनवलेल नसुन बापु तळपदेनी बनवलेलं आहे.
यासाठी ते वरती सांगितलेल्या बृहदविमानशास्त्र ग्रंथांचा आधार घेतात.
राजिव दिक्षित नुसार इंग्रजांनी बापु तळपदेला मदत करण्याच्या नावाखाली विमानशास्त्राची सर्व माहिती त्यांच्याकडून घेऊन लंडनला गेले आणी लंडनवरुन विमानशास्त्राची माहिती अमेरिकेतील राईट बंधुला मिळाली.
विमानशास्त्राची माहिती जर इंग्रजांना मिळाली होती तर त्यांनी ती माहिती राईट बंधुला कशासाठी दिली, ते स्वतःच्या देशात विमान बनवु शकत नव्हते का ?
ग्रंथात सांगीतलेले 4 विमान आणी राईट बंधुनी बनवलेल विमान यात जमिन आसमानचा फरक आहे.
जर भारतीय विमानशास्त्राची माहिती इंग्रजांकडुन राईट बंधुला मिळाली असती तर त्याच विमान बृहदविमानशास्त्रातील विमानाप्रमाणे असत.
बर मान्य केलं कि इंग्रजांनी विमानशास्त्राची माहिती चोरली पण मुळ ग्रंथ तर भारतात आजही उपलब्ध आहे.
त्याच्या आधारे आणी राजिव दिक्षित समर्थकांनी अत्ता पर्यंत किती विमान बनवली?
बहुतेक राजिव दिक्षितने ना बृहदविमानशास्त्र ग्रंथ वाचला होता ना आधुनिक विज्ञान.
त्यांना फक्त व्याख्यानाद्वारे भोळ्या मंदबुध्दी हिंदुना भ्रमित कस करायच हे माहिती होत.
मुळ ग्रंथ उपलब्ध असतांनाही ग्रंथात सांगितलेल्या 4 विमानांपैकी एकही विमान अजुन आर्य समाजीं बनवलेल नाही, राजिव दिक्षित आणी त्याच्या समर्थकांनीही बनवलेल नाही आणी rss ने ही बनवल नाही.
बहुतेक त्यांनाही माहिती आहे कि हे काल्पनिक विज्ञान विरोधी विमान कधीही बनवले जाऊ शकत नाही.
आर्य समाज,राजिव दिक्षित,rss यांचा उद्देश फक्त भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनामध्ये धर्माचा खोटा अहंकार निर्माण करुन आपल दुकान चालवणे हा आहे.
/////////////////////////////////
निष्कर्ष :
1. बृहदविमानशास्त्र या ग्रंथांचा ऋषी भारद्वाजशी कोणताही संबंध नसुन हा ग्रंथ 20 व्या शतकातील अर्धवट ज्ञानी पं. सुब्बाराय शास्त्री याचा आहे.
2. ग्रंथातील चारही विमान काल्पनिक आहे,त्यांची रचना व गति विज्ञान विरोधी आहे.
3.विमानाचे ऐतिहासिक जनक राईट बंधुच आहे.
त्यांच्याआधी कोणत्याही प्रकारच विमान अस्तित्वात नव्हत.
4.आर्य समाजी,राजिव दिक्षित आणी त्याचे समर्थन,rss हे सर्व भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुना भ्रमित करत आहे.
5.ग्रंथात सांगितलेलं कोणतही विमान आर्य समाजी,rss,कट्टर हिंदु कधिही बनवु शकत नाही.
कारण ग्रंथातील चारही काल्पनिक विमान विज्ञानाच्या नियमाच्या विरोधात आहे.
Comments
Post a Comment