आर्य समाज मनुस्मृति खंडन
मनुस्मृति मध्ये मिलावट झाल्याचा दावा सर्वांत आधी स्वामी दयानंद यांनी केला मनुस्मृति अध्याय 9 श्लोक 317 आणी 319 वर ते म्हणतात..... प्राचिन ग्रंथो मे बनावटी श्लोक डाल कर और नवीन रचनाएं कर के ब्राह्मणो ने अपनी शक्ति बढाई और मन्वादि स्मृतीयों में भी अपने महत्व के वाक्य मिला दिए. यदि दुष्टाचरण वाले ब्राह्मण की कोई निंदा करता, तो उस को ब्रह्मविरोधी कह कर उस कि हड्डी-हड्डी निकाल लेते थे. (स्वामी दयानंद सरस्वती, पुना प्रवचन पृष्ठ 134) यावर आर्य समाजी विद्वानांनी मनुस्मृति मधिल विवादित श्लोकांना प्रक्षिप्त घोषीत करायला सुरवात केली. विशुद्ध मनुस्मृति बनवण्याचा पहिला प्रयत्न आर्य समाजी तुलसीराम यांनी केला. आपल्या मनुस्मृति भाष्यामध्ये त्यांनी 382 श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले. दर वेळेस त्यांनी वेगळेच श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले पहिल्या 4 संस्करणात 382 श्लोक प्रक्षिप्त आहे तर पाचव्या संस्करणात 371 श्लोक प्रक्षिप्त आहे. 20 व्या शतकाची सुरवात नुकतीच झाली होती बदलत्या दृष्टीकोणानुसार 371 विवादित श्लोक आर्य समाज ला प्रक्षिप्त वाटत होते. ज्यात मांसक्षण,शुद्र विरोधी अमानविय कायदे आहेत...