Posts

Showing posts from July, 2021

पिंपळाचे झाड खरच 24 तास ऑक्सिजन देत का ?

Image
  पिंपळ वड 24 तास ऑक्सिजन देतात अशा काही कॉपी पेस्ट बऱ्याच वेळा वाचायला मिळतात जे की पूर्णपणे खोटं आणि विज्ञान विरोधी आहे.  कारण झाड ऑक्सिजन तेव्हाच सोडू शकत जोपर्यंत सूर्यप्रकाशाच्या मदतीने photosynthesis ची प्रक्रिया चालू आहे  एक chemical reaction होते  6 CO2 + 12 H2O + sunlight + Chlorophyll ➡️➡️➡️  ➡️ C6H12O6 + 6 O2 + 6 H2O  या तिघांपैकि झाडांना अन्न म्हणून फक्त C6H12O6 (glucose) ची आवश्यकता राहते   राहिलेल्या पाण्याला पेशींद्वारे शोषून पुन्हा photosynthesis च्या कार्यात लावले जाते आणि ऑक्सिजनला वातावरणात सोडले जाते.  हि सगळी प्रक्रिया तेव्हाच होते जोपर्यंत सूर्यप्रकाश उपलब्ध आहे  मग ते वड पिंपळ किंवा कोणतही झाड असो.  त्यामुळे वड पिंपळ हे 24 तास ऑक्सिजन देतात हे धार्मिक लोकांच pseudoscience आहे